बंद

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    प्राचीन काळी वाशिम ही राजा वाकाटकची राजधानी होती, ज्याला वत्सगुल्म असेही म्हणतात. ब्रिटिश राजवटीत वाशिमला मोक्याच्या ठिकाणामुळे जिल्ह्याचा दर्जा मिळाला. हेमाडपंथी मंदिरे आणि असंख्य तलावांमुळे जिल्ह्याची ख्याती झाली आहे. वाशिम हे महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील जिल्हा मुख्यालयाचे शहर आहे. तथापी, भारतीय इतिहासाच्या प्राचीन कालखंडातील पदम पुराणात या स्थानाचा संदर्भ आहे. वाशिममध्येच पाच ऐतिहासिक ठिकाणे आहेत. उदा.- १) भगवान बालाजी मंदिर, २) पद्मतीर्थ, ३) दरिद्र्य हरणतीर्थ, ४) गाेंदेश्वर मंदिर आणि ५) बालाजी तलाव.
    वाशिम जिल्ह्यात, 1) वाशिम, 2) मालेगाव, 3) मंगळूरपीर, 4) कारंजा, 5) रिसोड आणि 6) मानोरा हे सहा तालुके आहेत. सध्या, मंगळूरपीर येथे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय आहे. तसेच नजीकच्या काळात कारंजा आणि रिसोड येथे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, इतर महसूल कार्यालये, पोलीस अधिक्षक कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा परिषद आणि बस स्थानक हे जिल्हा न्यायालय, वाशिमच्या आवारापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे पक्षकारांना आणि वकिलांसाठी ते सोयीचे आहे.
    वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली. असे असतानाही वाशिम येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद निर्माण झाले नव्हते. वाशिमचा न्यायिक जिल्हा अकोला होता. तथापि, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई, दिनांक २७.०२.२०१३ च्या अधिसूचनेनुसार, वाशिम जिल्हा न्यायिक जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आणि तो दिनांक ०३.०३.२०१३ पासून अकोला[...]

    अधिक वाचा
    श्री. डी. के. उपाध्याय, सन्माननीय मुख्य न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई.
    मुख्य न्यायमूर्ती सन्माननीय श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य न्यायमुर्ती उच्च न्यायालय, मुबंई
    श्री. जी. ए. सानप . मा. न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपुर.
    मा. न्यायमुर्ती, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपुर तथा पालक न्यायमुर्ती वाशिम श्री. जी. ए. सानप.
    Shri. S. V. Hande, Principal District and Sessions Judge
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. व्ही. हांडे

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा